माथेरानमध्ये वाल्मिकी जयंती साजरी

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्ये वाल्मिकी जयंती येथील वाल्मिक बांधवानी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी वाल्मिकी बंधूंनी वाल्मिक नगर येथे एकत्रित मंदिरात पुजा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, युवा सेनेचे अध्यक्ष गौरंग वाघेला यांनी दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल चव्हाण, अक्षय लखन, दक्ष सोळंकी, साहिल लखन, गौरव लखन, हर्ष सोळंकी, राहुल चव्हाण, पिंकेश, तरुण चव्हाण, विव्हान चव्हाण, वरुण सरसार, यश पुरबिया, समीर शिंदे, चिंतामणी आदींनी परिश्रम घेतले होते.

Exit mobile version