गॅस दरवाढी विरोधात वंचितचे आंदोलन

| पनवेल | प्रतिनिधी |

वाढत्या महागाईविरोधात आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी (दि.6) जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले. पनवेल महानगर क्षेत्रातही या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. तसेच, काही ठिकाणी प्रतीकात्मक स्वरूपात रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात आले, त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाद्वारे गॅस सिलिंडरचे दर तात्काळ कमी करावेत, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि महागाईवर नियंत्रण आणावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. संबंधित मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

Exit mobile version