। मुंबई । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असलेले ओम गणेश सेवा मंडळ खुटिल मुळगांव यांच्यावतीने सार्वजनिक गौरी गणपती उत्सवानिमित्त सत्कार सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सुस्वर भजन, विविध स्पर्धा, त्याचबरोबर यावर्षी प्रथमच शक्ती-तुरा नाचाच्या जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शक्तीवाले शाहिर चंद्रकांत कदम सह संदिप तटकरे विरुद्ध तुरेवाले शाहिर महेश शिंदे या दोन युवा शाहिरांमध्ये जबरदस्त सामना रंगला होता.