| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा रसायनी येथील श्री साईबाबा मंदिराचा 27 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर, एचओसी कॉलनी-मोहोपाडा येथे संपन्न होतील.
शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारनंतर हळदी-कुंकू कार्यक्रम, ललिता सहस्त्रनाम, शनिवार दि.1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता भूपाळी, काकडा आरती, महामंगळ स्नान, अर्चना, आरती सकाळी 9 ते 12:30 वाजता गायनी – (11 कुंड) यत्र, पौरोहित्य, विशेष दुपारी मध्यान्न आरती, सायंकाळी सांज आरती, सकाळी 6:30 ते 8:30 वाजता मोहोपाडा ते श्री साई बाबा मंदिर श्री साई पालखी मिरवणूक, रात्री शेजआरती, रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त सकाळी भूपाळी, काकड आरती, 27 लिटर दुग्धाभिषेक, महामंगल स्नान, गणपती होम, श्री रुद्राभिषेकदशनी सायं. 4 ते 5 वाजता पूर्णाहुती, दुपारी अर्चना आरती, 5 वाजता संगीत भजन, सायं. 6 वाजता सांज आरती, सायं. 6:30 ते 8:30 वाजता ते 11:30 वाजता संगीत भजन, धामणी, कुंडेवहाळ यांचे होईल.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साईबाबा सत्संग केंद्र, कार्यकारी मंडळ रसायनीचे अध्यक्ष एम.एस.मगर (मो-9960940244) उपाध्यक्ष आंबवणे (985075 7121), सचिव-बी.जे.कोडिलकर (9689776975), उपाध्यक्ष-आरएम पोरे (9221382487) परिश्रम घेत आहेत.