। आपटा । वार्ताहर ।
आपटा ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. सभेत गावातील कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करणे, साप्ताहिक रसायनी टाईम्स व दैनिक कृषीवल यांना याबाबत जाहिरात देणे व शौचालय दुरूस्ती करणे, गावातील गटारीचे नियोजन करणे, आपटा फाटा येथील हेटवणे याचे लिकेज काढणे. गावातील गावतळी स्वच्छ करणे, गवत काढणे, कचरा उचलणे ही कामे तळी यांच्या भोवतालच्या परिसरात स्वच्छ ठेवणे याचबरोबरीने गावातील अंर्तगत रोडची कामे करणे.
कचरा व्यवस्थापन करणे व खत तयार करण्यात यावे. कचरा टाकतो तेथेच तो जाळून टाकणे इ. अनेक कामांबरोबरच गावात येणारी जलजीवन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन कमिटी नेमणे याच विषयावर बराच गदारोळ व तापातापी आरडाओरडा झाला व नंतर नवीन पाणी कमिटी साठी पुन्हा एकदा ज्यांनी नावे दिली आहेत त्याच्याशी संबंधित ग्रामस्थ यांना बोलावून मिटींग घेणे व इतर अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
यावेळी सरपंच नाजनीन पटेल, उपसरपंच मयूर शेलार, ग्रामविकास अधिकारी शेडगे, सदस्य मारुती चव्हाण, आसद पिठठू व सर्व महिला सदस्य व वृषभ धुमाळ मांडे व सर्व ग्रामस्थ अॅड. संजय टेंबे पत्रकार मृणाल कुलकर्णी व स्वप्नानील भुवड सखाराम पाटील व चव्हाण व मोहल्लातील अनेक महिला व ग्रामस्थ पिंपळ आळी महिला व अनेक ग्रामस्थ व दिलीप मोरे, पोलीस पाटील जुईली भोईर आदी उपस्थित होते.