। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील डिजिटल प्राथमिक शाळा देवकान्हे येथे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. केंद्रप्रमुख रश्मी साळी व माजी उपसरपंच ज्ञानदेव भोईर यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या गुणदर्शन कार्यक्रमाला समयी पाटील, दयाराम भोईर, उद्योजक नारायण कान्हेकर, ग्रा.पं.सदस्य दयाराम भोईर, जितेंद्र सुटे, संतोष भोईर, निलेश खेळू वारंगे, सहदेव भोईर, अरुण आगळे, विलास सुटे, अनिल सुटे, बाहे मुख्याध्यापिका सामंत, संदेश गायकवाड, प्रवीण भोईर, किशोर भोईर, ज्ञानेश्वर भोईर, रवींद्र पिंपळकर, तुकाराम भोईर, अविनाश कान्हेकर, रोहकले, अर्चना हाके, विश्वनाथ थिटे, प्रसाद भोईर, दिनेश भोईर, डीजे ऑपरेटर निलेश बामुगडे, रंगमंच व्यवस्थापक राजेंद्र माने, एफडीसी कंपनी नवेश माळी, शा.व्य.स. अध्यक्ष नितीन मारुती भोईर, उपाध्यक्ष उल्हास किसन भोईर, शिक्षणतज्ञ विष्णू भोईर व सर्व सदस्य, मुख्याध्यापक वृषाली नवेश माळी, विठ्ठल हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी खांब पंचक्रोशीतील रसिकप्रेमी नागरिक, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाचे पालक तसेच माजी विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाने हिंदी, मराठी गीते, रिमिक्स गीते, फनी सॉंग, नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकून सर्वांचीच वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज भोईर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.







