आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी7 जुलै रोजी अलिबागमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी निवासस्थानी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता हॉटेल मॅपल आय व्ही येथे मराठा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ११:३० वाजता पीएनपी नाट्यगृह येथे नाट्यगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. सायंकाळी 4 वाजता रेवदंडा येथे गौतम बुद्ध यांची मूर्ती आ.जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Exit mobile version