| गडब | वार्ताहर |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जेएसडब्लु स्टील लिमिटेडच्या सौजन्याने, सत्यनारायण क्रिडा मंडळ नवेगाव आयोजित पुरुष गटाच्या सरपंच चषक कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी संघाने विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे उदघाटन वडखळ ग्रामपंचायतीच्या शिवानी म्हात्रे, योगिता मोकल, प्रभाकर म्हात्रे, जेएसडब्लु कंपनीचे व्हाईस प्रेसिटेंड आत्माराम बेटकेकर, व्हाईस प्रेसिडेंड कर्नल भार्गवे, समीर गायकवाड, योगेश पाटील, सुनिल जांभळे, निलेश म्हात्रे, जयश्री म्हात्रे, विनोदीनी कोळी, प्रभाकर म्हात्रे, छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, राष्टीय खेळांडु संजय मोकल, मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष दिनेश म्हात्रे. आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धे दरम्यान, कबड्डी क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक वरसुआई वाशी, व्दितीय क्रमांक मरीदेवी धेरंड, तृतीय क्रमांक गावदेवी इंद्रनगर, चतुर्थ क्रमांक जय हनुमान उचेडे, या स्पर्धेत सर्वोत्कुष्ट खेळांडु अभिषेक भोईर (वरसुआई वाशी) उत्कृष्ट चढाई सुयोग गायकर (मरीदेवी धेंरड), उत्कृष्ठ पक्कड निशांत म्हात्रे (जय हनुमान उचेडे) पब्लिक हिरो अथर्व गावंड (गावदेवी इंद्रनगर) यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेवर निरिक्षक म्हणुन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळाचे सचिव अंजिक्य पाटील हे होते तर स्पर्धेवर पंच प्रमुख राष्टीय पंच के. जी म्हात्रे होते. या स्पर्धेचे समालोचन विश्वनाथ म्हात्रे, रंविद्र पाटील, अलकांर मनवी यांनी केले.





