। रसायनी । प्रतिनिधी ।
लोणावळा येथील आंबिवली या ठिकाणी दि फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट क्लब ऑफ इंडीया’ यांनी पुरस्कृत द व्हेली रन स्पर्धा 2025 आयोजित केली होती. यात एका चाकावर जास्तीत जास्त जोरात 550 सीसीची मोटार सायकल चालविण्याच्या स्पर्धेमध्ये रसायनीतील रिस येथील वेदांत शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वेदांतने देशभरातील स्पर्धंकात प्रथम येवून रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. वेदांत याने एका चाकावर कमी वेळात 400 मीटर अंतर 14 सेकंद मध्ये पार करुन स्पर्धा जिंकली आहे. वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे व प्रिया स्कूल मोहोपाडा येथील शिक्षिका निशा शिंदे यांचा चिरंजीव आहे. या यशाबद्दल वेदांतवर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







