वेदांत पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

| पनवेल | वार्ताहर |
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग मराठी माध्यमात इयत्ता आठवीत शिकणार्‍या वेदांत पाटील ने रायफल शूटिंग प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. अहमदाबाद येथे 8व्या वेस्ट झोन चॅम्पियन 10 मी एअर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सब-युथ/युथ/जुनियर गटातून वेदांत किरण पाटील याने 400पैकी 380 गुण मिळवले असून भोपाळ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी साठी त्याची निवड झाली. मुंबई येथील लक्ष्य शुटींग क्लब मध्ये तो ट्रेनिंग घेत असून भारतीय रायफल शुटींग टीम च्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीमती. सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे.

Exit mobile version