पुण्यात वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे शहर परिसरामध्ये हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवल्याचा आणि गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुण्यात बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. वेल्हे तालुक्यातील पाबे गावातून या तिघांना अटक करण्यात आले. कुठले ही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद मेन रोड परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 

Exit mobile version