वेणूनाथ कडूंंची श्रमिक विद्यालयाला भेट

खांब-रोहा | वार्ताहर |

राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी रायगड जिल्हा दौर्‍याचे औचित्य साधून श्रमिक विद्यालय चिल्हे येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक दीपक जगताप व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वेणूनाथ कडू व जिल्हा कार्यवाह अनिल पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी वेणूनाथ कडू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुनी पेन्शन योजना, नवी पेन्शन योजना तसेच विनाअनुदानित शाळा याबाबत परिषदेचे चाललेल्या कार्याबद्दल माहिती दिली. तर, परिषदेतर्फे भारतमाता पूजनाचा निर्धार केला असून, राज्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी देऊन विद्यालयास भारतमातेचा फोटो देण्यात आला. शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला भेडसावणार्‍या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक परिषद सदैव कटिबद्ध असल्याचे आवर्जून कडे यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version