| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत निवडणुकासाठी सकाळपासून 13.54 टक्के मतदान झाले आहे. वेश्वीमध्ये एकूण चार प्रभागात ही निवडणूक लढली जात आहे. थेट सरपंच पदासाठी शेकापक्षचे प्रफुल्ल पाटील यांच्यासह दोन उमेदवार रिंगणात असून 11 सदस्यांसाठी 22 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
एकूण 3 हजार 625 मतदार असून त्यात पुरुष 1 हजार 805 तर स्त्री 1 हजार 820 मतदार आहेत. त्यापैकी 9.30 वाजेपर्यंत 796 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 399 पुरुष तर 397 महिला उमेदवारांचा समावेश आहे.