श्रीवर्धनमध्ये विचार संवाद अभियान

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

जिल्हास्तरीय अंधश्रध्दा निर्मूलन विचार संवाद अभियानातंर्गत श्रीवर्धन, दिवेआगर, खुजारे गावांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यात जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारी श्रीवर्धन तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत खुजारे येथे भेट देऊन या ठरावामागील पार्श्वभूमी व त्यांनंतर या धाडसी निर्णयाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव जाणून घेतले. त्यांच्या या निर्णयाच्या प्रेरणेने इतर ग्रामपंचायत व समाज मंडळांनी आपापल्या गावात केलेल्या अंमलबजावणीची माहिती घेतली.

श्रीवर्धन माळी समाजाच्या पुढाकाराने समाज बांधवांसाठी विधवा प्रथा बंदी बरोबरच परिवर्तनवादी घेण्यात आलेले निर्णय, महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात विधवांनासुध्दा सन्मानपूर्वक सहभागी करुन घेणे, मृत्यूनंतरच्या कर्मकांडाना विधायक पर्याय देत रक्तदानासारखे उपक्रम समाजाच्या पुढाकाराने राबविणाऱ्या मंडळाने अंनिस सोबत संपूर्ण सहकार्य करत समाजातील सर्व घटकांसाठी विशेषतः महिलांसाठी कार्यक्रम घेण्यास उत्सुकता दर्शवली. या संपुर्ण प्रवासात सिध्देश कोसबे, श्रुती कोसबे, तृप्ती चोगले, राकेश केळस्कर, लिलावती खेडेकर, महादेव खेडेकर, शरद खेडेकर, समृद्धी घोले, अनंत गुरव, प्रविता माने शैलेश चोगले, महिला आणि ग्रामस्थाचे सहकार्य लाभले. तसेच सकारात्मक प्रतिसादाबद्दल अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version