। मुंबई । वृत्तसंस्था ।
दिवसागणिक लोकलची गर्दी वाढत असून ही गर्दी निष्पाप प्रवाशांच्या जीवावर उठत आहे. नोकरीनिमित्त डोबिवली ते मुंबई ये-जा करणाऱ्या तरुणाचा लोकलमधील गर्दीमुळे खाली पडून मृत्यू झाला.
आयुष्य जतीन दोशी (20) हा तरुण नोकरीनिमित्त डोबिवली ते मुंबई ये-जा करतो. मंगळवारी (दि.15) नेहमीप्रमाणे तो गर्दीने भरलेल्या लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना डोंबिवली आणि कोपर या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली पडून गंभीर जखमी झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारांसाठी तातडीने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
लोकलच्या गर्दीने घेतला तरुणाचा बळी
