विधान परीषद निवडणूक निकाल

। मुंबई । प्रतिनिधी ।
विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दे धक्का करत बाजी मारली आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. तर या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या दहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. पण चंद्रकांत हंडोरे यांचा पसंती क्रमांक पहिला असतानाही ते पराभूत झाले आणि भाई जगताप यांचा विजय झाला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची मते फुटली आहेत.

विधानपरिषद निवडणुतिचा सविस्तर निकाल
शिवसेना
सचिन अहिर व आमश्या पडवी या दोघांना मिळून ५२ मते मिळाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस
अनिल खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाली आहेत.

काँग्रेस
काँग्रेसकडे ४४ आमदारांचं संख्याबळ आहे त्यात भाई जगताप यांना २० तर चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली. काँग्रेसला एकूण ४२ मतं मिळाली.

भाजप
भाजप विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत.

Exit mobile version