महाविकास आघाडीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात सुरु आहे. प्रभाग पाचमधील नगरसेवकपदाचे उमेदवार निवेदिता राजेंद्र वाघमारे आणि समीर मधुकर ठाकूर यांचा प्रचार रविवारी सायंकाळी शितोळी आळीसह वेगवेगळ्या परिसरात करण्यात आला. घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवकपदासह 21 जागांसाठी ही लढत होती. मात्र, प्रभाग दोनमधील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या उमेदवारांकडून माघार घेण्यात आली. त्यामुळे आता एक नगराध्यक्ष व 19 नगरसेवक अशा वीस जागांसाठी ही लढत होणार आहे.
थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक, नगरसेवकपदासाठी प्रभाग एकमधून संतोष मधुकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर. प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील. प्रभाग तीनमधून साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे. प्रभाग पाचमधून निवेदिता राजेंद्र वाघमारे, समीर मधुकर ठाकूर. प्रभाग सहामधून ऋषीकेश रमेश माळी, अश्विनी ठोसर. प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर. प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे, अनिल चोपडा. प्रभाग नऊमधून योजना प्रदीप पाटील, सागर शिवनाथ भगत. प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महाविकास आघाडीमधील शेकाप, काँग्रेसच्या प्रभाग पाचमधील निवेदिता राजेंद्र वाघमारे, समीर मधुकर ठाकूर या उमेदवारांनी रविवारी (दि.23) सायंकाळी अलिबागमध्ये प्रचार केला. महादेव आळी, लेले चौक, मारूती नाका, बालाजी नाका, शितोळी आळी आणि बाजारपेठ हद्दीत घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसह मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळतानाचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी अलिबाग नगरपालिकेच्या माजी नगरसेवक संजना कीर, विनोद सुर्वे, काँगेसचे नेते काका ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, जयेंद्र वाघमारे, प्रसाद थळे, राजेंद्र वाघमारे, मिलिंद जाधव, जगदीश जाधव, शैलेंद्र तांडेल, प्रशांत वाघमारे, प्रकाश पावसकर, संदीप शिवलकर, बंड्या पेरेकर, अजय करंबत, रुपा वाघमारे, ललिता गायकवाड, आकाश पाटील, प्रसाद थळे, सलीम तांडेल, मोरेश्वर भगत आदी महाविकास आघाडीतील शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी उपस्थित होते.







