उरण | वार्ताहर |
सालाबाद प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उरण यांच्या वतीने विजयादशमीचा सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उरण नगरपरिषदेचे विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले .त्याच प्रमाणे डॉ .हेगडेवार व गुरुजी माधवराव गोलवालकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले . या कार्यक्रमास 36 तरुण व 8 बालके उपस्थित होते .सांगिक गीत घेण्यात आले.शेवटी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली .दसरा निमित्त महत्व सांगण्यात आले
सोने खरेदी साठी गर्दी उरण बाजारात पेठेतील पेडणेकर ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलससह अन्य सराफाच्या दुकानांत महिलांनी गर्दी केली होती वस्तू पूजा, नवीन दुकान उद्घाटन,गृहप्रवेश ,नवीन गाडी आदी वस्तू खरेदी करण्यात आल्या.