जेएनपीटी | वार्ताहर |
धुतूम येथे निमित तालुका विधी सेवा समिती उरण तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उरण दिवाणी न्यायालय क स्तर चे दिवाणी न्यायाधीश वाली,सह दिवाणी न्यायाधीश पोळ जेष्ठ विधिज्ञ पराग म्हात्रे, विजय पाटील, किशोर ठाकूर, योगेश म्हात्रे, धीरज डाकी, जितेंद्र कातरणे, जिवीका डाकी वृषाली पाटील,तालुका विधी सेवा समिती पदाधिकारी डी.आर.ठाकूर यांनी शिबिरात मध्ये मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी न्यायाधीशांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. या कार्यक्रमाला माजी उपसरपंच.सदानंद ठाकूर, माजी उपसरपंच सुंदर पाटील, माजी उपसरपंच प्रमोद कडू, सदस्य शरद ठाकूर, ग्रामसेवक विनोद मोरे साहेब, ग्रामस्थ रामचंद्र ठाकूर, दत्ता ठाकूर,.परशुराम ठाकूर,.कुंदन पाटील, .विनोद ठाकूर उपस्थित होते.