मनसेचे विलास डुकरे शिंदे गटात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष शेलू येथील विलास डुकरे यांनी आपल्या समर्थक यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शेलू आणि ममदापुर गावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

मनसेचे कर्जत तालुका उपाध्यक्ष विलास डुकरे यांनी आपल्या समर्थक यांच्यसह शेलू ग्रामपंचायतच्या सदस्य समृद्धी विलास डुकरे, तसेच आत्माराम मसणे,अंकिता मसने, तुषार डुकरे, मनोहर डुकरे, गणेश सकपाळ, गणेश ठोंबरें यांनी शिनसेनशिंदे गटामध्ये प्रवेश केला. तर ममदापुर ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाखा अध्यक्ष जयवन्त शिंगे आणि युवक कार्यकर्ते संदीप शिनारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे कर्जत तालुका उपप्रमुख अंकुश शेळके यांच्या पुढाकाराने शेलू आणि ममदापुर गावातील मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र थोरवे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,तालुका प्रमुख संभाजी जगताप आदी उपस्थित होते.

Exit mobile version