। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील वीट भट्टीवर काम करणार्या कामगारांचे थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी वाईड व्हिजन फाऊंडेशनकडून सर्वांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
शेलू गावातील वीटभट्टी गरिब कामगारांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वाईड विजन फाउंडेशन यांच्यावतीने ब्लँकेट देण्यात आले आहे. यावेळी वाईड व्हिजन फाऊंडेशन अध्यक्ष शीतल बोराडे, उपाध्यक्ष आशा मगर, सचिव नीलम कांबळे, तसेच समीक्षा बोराडे, सरोज मगर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते विलास डुकरे, रवी मसणे, सुनीता कदम, सुनंदा घाडी, शोभा तावरे, ज्योती दळवी, रोहिदास मसने, राजू मसणे, वसंत डांगरे आदी उपस्थित होते.