वस्सीम कुर यांची सामाजिक बांधिलकी
। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वस्सीम कुर यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने सोगाव, मुनवली, चोरोंडे येथील कचर्याची व गवताची गणेशोत्सवापूर्वी स्वच्छता केली.
वस्सीम कुर नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात. मग ते क्षेत्र कोणतेही असो. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य वा इतर कार्यात नेहमीच पुढाकार असतो. गणेशोत्सवात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, म्हणून त्यांनी सोगाव, मुनवली, चोरोंडे येथील मोठ्या प्रमाणात असणार्या सर्व कचर्याची जेसीबी व डंपरच्या सहाय्याने विल्हेवाट लावली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असणार्या गवताची साफसफाई करीत परिसर स्वच्छ करून दिला. याशिवाय पुढील काळात कचरा करू नये व कचरा घंटागाडी यामध्ये टाकावा याबाबत सूचना करत जनजागृती केली. यावेळी वस्सीम कुर यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी कौतुक करत आभार मानले आहेत.