। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील तिसंगी अळूचा खोड येथील जंगलमय भागात पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूनिर्मिती करणार्या धंद्यावर धाड टाकून 1 लाख 34 हजार 500 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित अनंत भोसले (38) असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
ही कारवाई रविवारी (दि. 18) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही अळूचा खोड जंगलमय भागात अजित अनंत भोसले 38 यांनी आपल्या ताब्यात गैर कायदा गावठी दारू बनवण्याकरिता लागणारे साहित्य जवळ बाळगले व गावठी हातभट्टीची दारू गाळताना सापडला. त्याच्याकडे एकूण मिळालेल्या 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालामध्ये 25 हजार रुपयांची गुळ नवसागर मिश्रित 500 लिटर तयार कुजके रसायन टाकीसह तसेच 2 हजार लिटर 1 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचे गूळ नवसागर मिश्रित तयार केलेले कुचके रसायन टाकीसह आणि 7 हजार रुपये किमतीची 70 लिटर गावठी हातभट्टीची दारू असा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.