। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनी शाखा मार्गताम्हाणे यांचा अत्यंत गलथान कारभार सुरू आहे. दररोज सात ते आठवेळा विद्युत पुरवठा खंडित करतात. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सोमवार दि. 19 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. त्यानंतर पुन्हा 5 वाजता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. संध्याकाळीही विद्युत पुरवठा पुन्हा खंडित केला. दररोज विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे संपूर्ण दळणवळण ठप्प होते. त्यामुळे विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत.
रामपूर उमरोली येथे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 20 मे अखेरीस विद्युत बिले अजूनही दिलेली नाहीत. त्यामुळे ग्राहकांवर बिलांचा बोजा पडला आहे. मार्गताम्हाणे विद्युत कार्यालयात संपर्क केला असता अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यात सुधारणा व्हावी, वारंवार विद्युत पुरवठा बंद करू नये, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.