जयंत पाटील, सुप्रिया पाटील यांच्याकडून गावभेटींवर भर
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड, वाघोडे हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि काही विशेष सूचना देण्यासाठी माजी आमदार जयंत भाई पाटील यांनी आवर्जून गावभेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, कार्यकर्ते, युवक यांना प्रत्यक्षात भेटून हितगूज केले.
अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ भाई जयंत पाटील यांनी बुधवारी (दि. 13) सकाळी कुर्डुस जिल्हा परिषद मतदारसंघातील पोयनाड, वाघोडे, चोरगोंडी, आंबेघर, बांधण, चंदरवाडी आदी भागाचा दौरा केला. यावेळी प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मागील पाच वर्षांत चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बचत गट बळकटीकरण याबाबबत मोठे काम केले आहे. मुलींना सायकली वाटप, नेत्रतपासणी शिबिरातून मोफत चष्मे वाटप, कोरोना काळात पीडितांना सढळ हस्ते मदत केली केली आहे. त्यामुळे या विभागातून मोठ्या प्रमाणात चित्रलेखा पाटील यांना मताधिक्य मिळणार, असे आश्वासन जनतेने गावभेटीदरम्यान दिले आहे. याचबरोबर इंडिया आघाडीच्या काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनादेखील धन्यवाद देऊन पाठीशी असल्याबद्दल जयंत पाटील यांनी आभार व्यक्त केले. या सभेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी वाघोडे, पोयनाड, बांधण, पेझारी, चोरगोंडी, आंबेघर, चंदरवाडी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, निष्ठावंत अनुभवी तरुण, युवा कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी भाई जयंत पाटील, सुप्रिया पाटील, माजी पंचायत समिती सभापती बाळू पाटील, माजी सरपंच सतीश तरे, माजी सरपंच करण जैन, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सतीश उर्फ बंडू पाटील, सुनील पाटील, सुरेश म्हात्रे, आंबा बागायतदार चंद्रकांत मोकल यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे, संदेश पाटील यांनी केले.