। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसपर्यंत एक अर्ज वगळता कोणीच अर्ज दाखल केला नाही. 9 सदस्यपदांसाठी जागांसाठी 1 तर थेट सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. जात दाखल्याच्या वैधता प्रश्नांमुळे कोप्रोली येथील निवडणूकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकन्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये बहुसंख्य असलेल्या मच्छिमार समाजाने आपले जात प्रमाणपत्र जात पडताळणी मध्ये असलेल्या जाचक अटींमुळे अवैध ठरत असतात. त्यामुळे कोणालाही राखीव असलेल्या आपल्या आरक्षित जागेवर निवडणूक लढता येत नाही. कोणी निवडणूक लढलीच ते जात प्रमाणपत्र पडताळणी मध्ये अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द ठरवले जाते. त्यामुळे मच्छीमार समाजाने गावकीत निर्णय घेत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याने गेले निवडणूकच होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.