कलम वाडीतील ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील कलम वाडी येथे स्वदेश फाऊंडेशन व लोकवर्गणीतून तयार केलेल्या शुद्ध नळ पाणी योजनेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या योजनेमुळे कलम वाडीतील ग्रामस्थांना नळाद्वारे शुद्ध पाणी थेट घरापर्यंत मिळाले आहे. पाणी हे जीवन आहे, मुबलक व शुद्ध पाणी असेल तर मानवी जीवन सुखकर होते. पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण भटकंती व हाल थांबावेत या उद्देशाने स्वदेस फाऊंडेशने पुढाकार घेऊन कृतिशील काम हाती घेतले आहे. यातूनच ही योजना साकारली असल्याचे समाधान आता ग्रामस्थ व महिला व्यक्तकरीत आहेत.

त्यामुळे लोकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. उद्घाटनावेळी सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार, सरपंच उमेश यादव, भाग्यश्री पाठारे, संतोष भोईर, स्वदेसचे दयानंद माने, उपसरपंच योगेश सुरवकर, ग्रामसेवक ए. टी. गोरड, रमेश पवार, कृष्णा वाघमारे, बबन वाघमारे, तुकाराम पवार, मंगेश यादव, गंगाराम सावंत, अंकेश पोंगडे, आशिष यादव, सतीश कदम, प्राची कदम, मनीषा पोंगड, दयानंद माने, राकेश बारस्कर, प्रवीण पाटील, नंदू पवार, तुळशीराम पवार, मालू पवार, रवींद्र यादव, सुनील पोगडे, गणेश यादव, कृष्णा वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Exit mobile version