जांभूळपाडा स्मृतिस्तंभाला गावकऱ्यांची श्रध्दांजली

प्रत्यक्षदर्शनींनी जागवल्या आठवणी

| पाली/बेणसे | वार्ताहर |

23 जुलै 1989 ची काळरात्र जांभुळपाडा सुधागड वासीयांसाठी काळरात्र ठरली. एका रात्रीत महाप्रलयाचे तांडव किती भयानक असु शकते याचा प्रत्यय 34 वर्षापूर्वी सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा या गावातील नागरिकांनी अनुभवले आहे. आजही या महाप्रलयाचे साक्षीदार यांनी ही घटना आठवली तरी डोळयात पहिले अश्रु उभे राहतात. या महापुरात गतप्राण झालेल्या 80 ग्रामस्थांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणुन बांधण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला ग्रामस्थ, शासकीय अधिकारी व विद्यार्थ्यातर्फे दि.(24) सोमवारी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी तहसिलदार उत्तम कुंभार, पाली पोलीस ठाणेच्या पोलीस निरिक्षक सरिता चव्हाण, जांभुळपाडा पोलीस ठाणेचे पोलीस पदाधिकारी व सर्व कर्मचारी श्री सिध्दलक्ष्मी मंदिर जांभुळपाडा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच रविंद्र खंडागळे, भास्कर शेळके, जयवंत बहाडकर, सुनिल साठे, मिलिंद शिंदे व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणी जीव वाचविण्यात तर कोणी इतरांचे जीव वाचविण्यासाठी पुढे आले होते. महादु काळभोर, भास्कर शेळके, हिंमत माळी अशा अनेक जण आजही हया महाप्रलयाचे साक्षीदार आहेत व त्यांच्या आठवणी आहेत. नेस्तनाबुत झालेल्या या जांभुळपाडा गावाला चारही बाजुने मदतीचा ओघ सुरू झाला. शासकीस मदतही विनाविलंब मिळायला लागली. हि सर्व येत असलेली मदत स्थानिक मंडळींनी शाळेत जमा करून लोकांपर्यंत पाहोचविण्याचे कार्य युध्द पातळीवर केले. पुनर्वसनाचे काम युध्द पातळीवर सुरू केले गेले व बघता बघता पाच ते सात वर्षाच्या कालखंडात अनेक विधायक कामे पार पडली व पुन्हा जांभुळपाडा गाव उभा राहिला.

23 जुलै 1989 ची रात्र जांभुळपाडा गावाच्या दृष्टीने काळरात्र ठरली. एका रात्रीत संपूर्ण गाव उध्वस्त झाले आणि होत्याचे नव्हते झाले. रस्ते, मंदिरे, शाळा, घरे सगळा गाव जमिनदोस्त झाले. अनेक ठिकाणी प्रेत अडकलेले व लटकलेले पाहिल्यांनतर जीवाचा थरकाप उडाला.

जे.बी.पाटील, निवृत्त शिक्षक
Exit mobile version