चिल्हार नदी जोडप्रकल्पसाठी बैठकांचे सत्र सुरु
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका ग्रामिण आणि आदिवासीबहुल भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. त्या तालुक्यातील 100 हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांच्या भागातून वाहणार्या चिल्हार नदी कोरडी असल्याने पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते आणि ती स्थिती दूर करण्यासाठी चिल्हार नदी जोडप्रकल्प सुरु करावा, या मागणी साठी स्थानिक ग्रामस्थांनी बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.
कर्जत तालुक्यात उल्हास नदी ही बारमाही वाहणारी नदी असून, त्याचप्रमाणे या नदीला जोडणार्या उपनद्यांमध्ये पेजनदी आणि चिल्हार नदी यांचा समावेश होतो. पेज नदीसुद्धा बारमाही वाहणारी नदी आहे. तर, चिल्हार नदी उन्हाळी मात्र कोरडी पडते. मोग्रज, टेंबरे, पाथरज, कशेळे, बोरीवली, पिंपलोळी, वाकस या सात ग्रामपंचायतींमधील गावे आणि असंख्य वाड्या चिल्हार नदीच्या तीरावर आहेत. नदी कोरडी असल्याने उन्हाळ्यात त्या सर्व ग्रामपंचायतींमधील गावात पाणीटंचाई असते. दुसरीकडे नदी कोरडी असल्याने त्या ठिकाणी पाणी नसल्याने पाण्याअभावी चिल्हार नदी काठच्या जीवसृष्टीला तसेच जनतेला उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे पाण्याअभावी या भागाचा विकास मंदावला आहे.
…तर गावांचा विकास होईल
त्यामुळे शेती व्यवसायाला चालना मिळावी त्यात प्रामुख्याने शेती भाजीपाला, पशुपालन व इतर जोडधंदे यावर जास्त अवलंबून आहेत. पाणी हे जीवन आहे. चिल्हार नदीकाठच्या गावांचा जीवन आणि विकास चिल्हार नदी चालू झाली तर या भागाचा विकास होईल. त्याचबरोबर चिल्हार नदी बारमाही वाहणारी नदी झाल्यास त्याचा फायदा सात ग्रामपंचायतींमधील गावांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आयोजित बैठकीला त्या भागातील पाणीटंचाई ग्रस्त भागातील सर्व ग्रामपंचायतींमधील कार्यकर्ते उपस्थित होते.