शेकापचे विनायक पाटील ठरले जायंट किलर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मोठी रंगत चर्चेची ठरली होती ती शेकापचे युवा नेते विनायक विलास पाटील आणि शिवसेना तालुकाप्रमुख शंकर तथा महेश अरुण गुरव यांच्यात. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. प्रथमच निवडणूक लढवणार्‍या शेकापचे विनायक पाटील यांनी शंकर गुरव यांना चितपट करीत विजय मिळवत ते जायंट किलर ठरल्याने त्यांचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

त्याप्रमाणे शेकापचे माजी उपसरंपच आनंद बुरांडे यांच्या पराभवाची व्युहरचना विरोधकांनी केली होती. मात्र आनंद बुरांडे यांनी शेकापच्या विकासकामांच्या जोरावर बाजी मारत विरोधकांना आस्मान दाखवले.

Exit mobile version