। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद शाळा साखर येथे ‘मार्केट डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मांडणी केली होती. विद्यार्थी आणि पालक यांनी मनमुराद आनंद लुटला.
ह्या कार्यक्रमासाठी आक्षी ग्रामपंचायत सरपंच रश्मी पाटील, विनायक पाटील, कुंजल पाटील, निरंजा नाईक, केंद्र प्रमुख प्राची ठाकूर, चौल केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, मनोज हारे, निलेश चौलकर, अध्यक्ष तेजस तांडेल, उपाध्यक्ष रेश्मा भूकवार, रणजीत गण, विनायक भगत, जय बुरांडे, किरण बुरांडे, दिपा फाळके, दिलीप फाळके, पालक, ग्रामस्थ, रिमा गुरव, मंजुळा लाड, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उपशिक्षिका स्मिता चिखले, अमिषा मुंढे उपस्थित होते.