विंधणे रस्ता होणार चकाचक

| चिरनेर | प्रतिनिधी |

विंधणे हरिश्चंद्र पिंपळे बोरखार या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या होणाऱ्या मजबुतीकरणामुळे बोरखारवासीय ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील बोरखार या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे.

या कामासाठी 1,76,00698 इतक्या रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. तर अडीच कि.मी.च्या या रस्त्याचे काम पी.पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन अँड कंपनीच्या अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. यावेळी उद्योगपती पी.पी. खारपाटील, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, रवी भोईर, राणी म्हात्रे, रोशन डाकी, प्रसाद पाटील, अजित पाटील, मनोहर फुंडेकर, अतुल पाटील, शशिकांत म्हात्रे, समीर मढवी, मनोहर म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version