माणगाव निजामपूर-पाचाड मार्गावर बसला भीषण अपघात

एकाचा मृत्य, 37 प्रवासी जखमी
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावजवळील निजामपूर-पाचाड मार्गावर खाजग बसला अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 37 प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या बसमधुन प्रवास करणार्‍यांपैकी सहा प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समजले आहे.
एम.एच 04 एफ के 7799 या क्रमांकाच्या बसने ते रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस निजामपूर-पाचाड मार्गावर आली असता एका वळणावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमधील प्रवास करणारे प्रवासी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील रहिवासी आहेत. यात बस चालकाचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर बसमधील 37 प्रवाशांपैकी 6 प्रवाशी गंभीर आहेत.

Exit mobile version