विशाखा दिवेकर प्रथम

। कोर्लई । वार्ताहर ।
जंजिरा विद्या प्रसारक मंडळ संचलित मुरुड तालुक्यातील काशिद येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेची विद्यार्थिनी विशाखा उल्हास दिवेकर ही 90 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. श्रुतिक सुनील कांगणे हा 89.60 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर वेदांती विजय कांगणे ही 87.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
जंजिरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ (संचिका) चे अध्यक्ष विजय शिंदे, नरेश धारवे, अंकुश चाचे, सचिका सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच सर्वे, चिकणी व काशिद गावातील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Exit mobile version