गोमाशी येथे विश्‍वकर्मा जयंती साजरी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

गोमाशी येथे सुतार समाजाच्या वतीने प्रभू श्री विश्‍वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री विश्‍वकर्मा जयंतीचे औचित्य साधून गोमाशी येथे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विश्‍वास गोफण यांनी गोमाशी गावातील उपस्थित महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक बंदीच्या संदेश देण्यात आला.विश्‍वास गोफण हे भार्जे येथील असून गेली 18 वर्षे मोफत कापडी पिशव्याचे वाटप करीत आहेत. आतापर्यंत चार लाखापेक्षा जास्त कापडी पिशव्याचे मोफत वाटप करून सामाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

Exit mobile version