चित्रलेखा पाटील यांची ताजपूरला भेट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील ताजपूर येथील डोंगरभागात शुक्रवारी (दि.28) दरड कोसळल्याची घटना घडली होती. याची माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील गावांतील ग्रामस्थ महिलांशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतली. ताजपूर गावाला दरडीपासून संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनसह शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी शेकापचे विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ, गिरीश झावरे, तेजस म्हात्रे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version