| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील बोकडविरा गावातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व गणपती देवस्थान, बोकडविराचे माजी ट्रस्टी नारायण गोपीनाथ पाटील यांच्या सुविद्य पत्नी विठाबाई नारायण पाटील यांचे शुक्रवार, (दि.18) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पार्थिवावर बोकडवीरा वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दहावे रविवारी (दि.27) श्रीक्षेत्र माणकेश्वर येथे, तर उत्तरकार्य मंगळवारी (दि.29) बोकडवीरा येथे होणार आहेत.