तब्बल बारा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ व टाटा कॅपिटलच्या संयुक्त विद्यमाने शारदा विद्या मंदिर, पेडली येथे ‘प्रोजेक्ट सुविद्या’ अंतर्गत अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बारा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा अत्यंत नियोजनपूर्वक संपन्न झाली.
पाचवी ते सातवी या गटासाठी नऊ, आठवी ते दहावीसाठी चोवीस तर अकरावी व बारावी या गटासाठी चार स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी स्पर्धकांनी त्यांना दिलेल्या विषयावर आपली मते खुलेपणाने व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघोशी शाळेचे मुख्यध्यापक राजेश गोळे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश शेडगे यांनी, तर संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व रेकॉर्ड तपासण्याचे काम सुजीत जगताप यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जंगम, बोरीटकर, जाधव, निंबाळकर, अभ्यंकर, कुंभार या शिक्षिकांनी काम पाहिले. यावेळी मुख्यध्यापक नेमाडे, तालुक्यातील शाळांचे शिक्षक, शिक्षिका, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे बळीराम निंबाळकर, दत्तात्रय दळवी व इतर उपस्थित होते.
स्पर्धेत विजयी झालेले विद्यार्थी
पाचवी ते सातवी गट:-
प्रथम क्र. – प्राजक्ता प्रदीप नाझीरकर, ग.बा. वडेर, पाली, विषय – आरोग्यम धनसंपदा
द्वितीय क्र. – भार्गव राहुल मराठे, ग. बा.वडेर, पाली, विषय – वृक्ष माझा सखा
तृतीय क्र. – सृष्टी संतोष खापरे, आत्मोन्नती विद्यालय, जांभूळपाडा, विषय – आरोग्यम धनसंपदा
आठवी ते दहावी गट:-
प्रथम क्र.- स्नेहा अशोक कुवर, ग.बा. वडेर, पाली, विषय – मोबाइल शाप की वरदान
द्वितीय क्र. – आदिती संजय ठाकूर व स्नेहल सतीश दिने, शारदा विद्यामंदिर, पेडली, विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य
तृतीय क्र. – ऋतुजा राजेंद्र खेडेकर, माध्यमिक विद्यालय वाघोशी, विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य
अकरावी ते बारावी गट:-
प्रथम क्र.- प्रणाली श्याम खैरे, ग.बा. वडेर, पाली, विषय – मोबाइल वापराचे परिणाम
द्वितीय क्र. – विवेक विलास डुबे, ग.बा. वडेर, पाली, विषय – मोबाइल वापराचे परिणाम
तृतीय क्र. – दिशा तानाजी चव्हाण, आत्मोन्ंनती विद्यालय, जांभुळपाडा, विषय – मोबाइल वापराचे परिणाम