| मुंबई | वृत्तसंस्था |
मुख्य प्रशिक्षकाच्या घोषणेनंतर कोचिंग स्टाफच्या उर्वरित पदांचा शोधही तीव्र झाला आहे. बीसीसीआय आता फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचा शोध घेत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे भारतीय संघाचे नवे सहाय्यक प्रशिक्षक बनू शकतात. तर माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहू शकतात. रिपोर्टनुसार, गंभीर स्वतः फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावू शकतो. गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अद्याप काहीही ठरलेले नाही. बीसीसीआय आणि गंभीर लक्ष्मीपती बालाजी आणि विनय कुमार यांच्या नावांचा विचार करत आहेत. दोघांनी यापूर्वी केकेआर मध्ये गंभीरसोबत काम केले आहे.
अभिषेक सहायक प्रशिक्षक
