मतदान करा, मसाले मजुरीवर सवलत मिळवा

| पनवेल | संजय कदम |

पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त मतदान मतदार राजाने करावे यासाठी जयहिंद मसाला अ‍ॅण्ड फ्लोअर मिल यांनी मतदान करा व मसाले मजुरीवर 50 टक्के सवलत मिळवा, असा अभिनव उपक्रम दि. 20 ते 26 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती समीर माखेजा यांनी दिली.
जास्तीत जास्त पनवेलकरांनी मतदान करावे, आपला मतदानाचा हक्क बजावावा व राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी जयहिंद मसाला अँड फ्लोअर मिलच्या माध्यमातून ग्राहकांना आगळीवेगळी योजना राबविण्यात येत असून, त्यामध्ये मतदान करा व मसाला मजुरीवर 50 टक्के सवलत मिळावा (चालू दर 40 रु.आहे.) यासाठी प्लॉट नं.-66, कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्पतरू रोड, जे.म. म्हात्रे ऑफिसच्या समोर, पनवेल मो. 9320044033/9702244033 येथे संपर्क साधावा, असे आवाहन समीर माखेजा यांनी केले आहे.

Exit mobile version