माथेरानमध्ये मतदार नोंदणी अभियान

| नेरळ | प्रतिनिधी |

राज्य निवडणूक आयोगाने दोषमुक्त मतदान याद्या तयार करण्यावर भर दिला आहे. याच माध्यमातून माथेरान शहरात मतदान नोंदणी करण्यावर भर देण्यात आला आहे. बीएलओ सचिन भोईर आणि नगरसेविका रिझवाना शेख यांच्या पुढाकाराने कॅम्प लावून नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. माथेरान मध्ये नवीन मतदार नोंदणी आणि मतदार दुरुस्ती तसेच सदोष मतदार यादी तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून प्रयत्न सुरु केले आहे. या मोहिमेच्या अंतरंगात माथेरान येथे शिबीर घेण्यात आले होते. बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेले नगरपरिषद शाळेचे शिक्षक सचिन भोईर यांच्या उपस्थितीत हे मतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी माथेरान नगरपरिषदेच्या नगरसेविका रिझवाना शेख यांनी शहरातील नागराईकांना या शिबिरासाठी आवाहन केले होते. या शिबिरामध्ये माथेरान शहरातील 200 हुन अधिक नागराईकांनी आपले मतदान ओळखपत्र आणि नवीन नोंदणी व दुरुस्तीची कामे पूर्ण केली.

Exit mobile version