नागोठण्यात दिव्यांगांसाठी मतदान जागृती

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात दिव्यांग मतदार बांधवांसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा नायब तहसीलदार उज्वला भोईर-अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे व तलाठी गणेश विटेकर, दिव्यांग संघटनेचे सुधाकर पत्की, मेहबूब अत्तार, नितीन म्हात्रे यांच्यासह शहर व विभागातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. भोईर-अंधारे यांनी दिव्यांग बांधवांना त्यांना निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर येणार्‍या विविध अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले.

Exit mobile version