मतदान जनजागृती प्रभातफेरी

। रसायनी । वार्ताहर ।

नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार कर्तव्य भावनेने बजवावा यासाठी मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम अर्थात स्वीप अंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातल्या वासांबे मोहोपाडा येथील कांबे राजिप शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती प्रभातफेरी काढून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच, निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक पुंडलिक पाटील, शिक्षक शहाजी घायतिडक, शुभांगी भंडारकर, जागृती तेलंगे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत उद्बबोधन केले.

Exit mobile version