| माणगाव | प्रतिनिधी |
हिरवळ एज्युकेशन ट्रस्टतर्फे महाड विधानसभा मतदार संघ व महाड तहसील कार्यालय संलग्नित मतदान जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास नायब तहसीलदार काशिनाथ तिरमले, सेक्रेटरी संतोष बुटाला, प्राचार्य सुदेश कदम, प्राचार्य राकेश वडवळकर व प्राचार्या विद्या गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाचे भविष्य घडविण्यात सुशिक्षित तरुण वर्गाचा मोलाचे योगदान असणे गरजेचे आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार पूर्ण जबाबदारीने पार पाडणे महत्त्वाचे आहे असे मत प्राचाय सुदेश कदम यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नायब तहसीलदार काशिनाथ तिरमले, यांनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी कशी करावी याची संपूर्ण प्रक्रिया समजून दिली. त्याच बरोबर त्यांनी विद्यार्थ्याना मतदार नोंदणी नंतर काही बदल करावयाचे असल्यास कोणते अर्ज भरावे व ते कसे भरावे ह्या बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेले नवीन मतदार नोंदणीचे अर्ज सादर करण्यात आले.