आत्करगाव येथे विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती

| खोपोली | प्रतिनिधी |

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, मतदानाचे महत्त्व पटवून सगळ्यांनी मतदार करावे, अशी जनजागृती आत्करगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढत केली. केंद्रप्रमुख जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव हद्दीतील आत्करगाव, आडोशी व आत्करगाव कातकरवाडी येथे मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.

या रॅलीद्वारे घोषणाबाजी करत आत्करगाव शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र खेमनर व विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये रंगत आणली. आकर्षक रांगोळी काढून आडोशी शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे आणि खेमनर मॅडम यांनी शालेय परिसर सुशोभित केला. या कार्यक्रमाला आत्करगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शर्मिला भोईर, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आत्करगाव कातकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका अमृते, चारवाडीकर सर आदींसह ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version