वाडेकर कुटुंबियांचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

| रेवदंडा | वार्ताहर |

गोवामुक्ती आंदोलनात 1955 साली तेरेखोल किल्ल्यावर हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मा शेषनाथ वाडेकर (रेवदंडा) व हुतात्मा हिरवे गुरुजी (पनवेल) यांच्या कुटुंबियांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांनी 1955 साली पोर्तुगीजांशी लढत गोव्यातील तेरेखोल किल्ल्यावर आपल्या प्राणांची आहुती देत तिरंगा फडकविला आणि गोवामुक्ती आंदोलनात आपली मुख्य व अभूतपूर्व अशी भूमिका निभावली.

हुतात्मा शेषनाथ वाडेकर हे नेहमीच गरीब व सर्वसामान्य लोकांना मदत करत असत, म्हणून रेवदंडा व थेरोंड्यातल्या ग्रामस्थांकडून त्यांना ‘राजा माणूस’ हे नाव देण्यात आले होते. हे असे आसतनाही त्यांची मुले कायम वंचित राहिली. हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांनी हौतात्म्य पत्करले त्यावेळी त्यांची तिन्ही मुले फार लहान होती. मोठी मुलगी वंदना वेदपाठक-वाडेकर (7), मधली मुलगी जयश्री वेदपाठक-वाडेकर (5) व लहान भाऊ जयंत वाडेकर तीन महिन्यांचे होते.

वाडेकर यांच्या कुटुंबियांना सन्मानित केल्याबद्दल गोवा सरकार व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानत आहेत. राज्य सरकारने हौतात्म्य पत्करणार्‍या हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांच्या कुटुंबियांची दखल घ्यावी, आशी विनंती वाडेकर यांचे कुटुंबीय करत आहे.

या सन्मान सोहळ्यात हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांचा मुलगा जयंत वाडेकर, सून सरिता वाडेकर, मुलगी वंदना वेदपाठक-वाडेकर, मुलगी जयश्री वेदपाठक-वाडेकर, नातू कुणाल वाडेकर, नातसून जुही वाडेकर, नातू अमित वेदपाठक, नातसून दिपीका वेदपाठक, नातू मिलिंद वेदपाठक, नातसून नमिता वेदपाठक, नात समृद्धी सातघरे, पणतु मिहीर सातघरे, पणतु निनाद वाडेकर, पणती श्रीजा वाडेकर व पणती अनन्या वेदपाठक या उपस्थित होत्या.

Exit mobile version