वॅगनरच्या धडकेने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरापासून 11 किमी अंतरावर असणार्‍या धरणाचीवाडी येथे फाट्याजवळ महामार्गावर वॅगनर कारची पाठीमागून मोटार सायकलला जोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू होऊन मोटार सायकलचे नुकसान झाले. या अपघाताची फिर्याद प्रणाल प्रकाश घाग रा. कोस्ते खुर्द ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
प्रकाश अर्जुन घाग हे त्यांच्या ताब्यातील शाईन मोटार सायकल(एम.एच.06 – सीबी -5426 ) ही गाडी घेऊन इंदापूर बाजूकडे जात असताना माणगावजवळील मौजे धरणाची वाडी फाट्याजवळ वळण घेत असताना अचानक पाठीमागून येणार्‍या वॅगनर कारची मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात प्रकाश घाग याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला.या अपघात प्रकरणी गाडीवरील चालक सुहास सदाशिव कदम रा.नालासोपारा याच्या विरोधात माणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.

Exit mobile version