माथेरान मुख्याधिकार्‍यांच्या प्रतिक्षेत

| कर्जत | प्रतिनिधी|

माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची बदली पुणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर झाल्यामुळे माथेरान नगरपालिकेच्या रिक्त पदावर कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केली आहे.

नवीन मुख्याधिकारी माथेरानला कधी येतील याची शाश्‍वती नाही. गेल्या एक वर्षापेक्षा अधिक काळ निवडणुका लांबणीवर पडल्याने मुख्याधिकार्‍यांना प्रशासक म्हणून भूमिका पार पाडावी लागत आहे, तसेच कर्जत नगरपालिकेचा कारभार मोठा असल्याने दोन्ही कारभार सांभाळून काम करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सध्या माथेरानमध्ये ई-रिक्षासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तसेच पेव्हर ब्लॉक रस्त्याची रखडलेली कामे याकरिता मुख्याधिकारि असणे गरजेचे आहे. तरी, माथेरानला लवकरात लवकर नवीन मुख्याधिकारी मिळावा किंवा नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महसूल खात्याचे अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कारभार द्यावा, जेणेकरून नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लागतील, अशी मागणी माथेरानमधून होत आहे.

Exit mobile version