वाकडी आश्रमशाळाने पटकावला प्रथम क्रमांक

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग, पनवेल गणित विज्ञान अध्यापक मंडळ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 वे पनवेल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित श्री अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा वाकडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेने सोलर प्लॅनेट खालील रिकाम्या जागेत शाश्वत शेती हा प्रकल्प तयार करून सादर केला. माध्यमिक शिक्षक गावीत डी एच यांच्या मार्गदर्शनाखाली अलीशा गडखल आणि रोहिणी वाघमारे यांनी या प्रकल्पाची मांडणी केली. या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक- शिक्षकेतर वृंद आणि संस्थाप्रमुख यांचे योगदान लाभले आहे. या सर्वांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Exit mobile version