। पनवेल । प्रतिनिधी ।
वारकरी हे समाज प्रबोधनाचे काम करत एक सक्षम समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र प्रसिध्दीपासून ते दूर राहतात. समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्यांनी व पत्रकारांनी असाच कायम सुरु ठेवावा, असे प्रतिपादन पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी केले. नवीन पनवेल येथील बांठीया हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन्मान प्रबोधनाचा या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाजप्रबोधनाचे काम करणार्या वारकार्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाजप्रबोधनकारांचा सत्कार केला.
यावेळी इक्बाल काजी, गणेश कडून, सुशिला घरत, तुकाराम दुधे, राजेंद्र कोलकर, पद्माकर पाटील, धाऊ पाटील, निलेश सोनावणे, निलेश सोनावणे, संतोष भगत, आनंद पवार, गणपत वारगडा, रविंद्र गायकवाड, विशाल सावंत, संतोष सुतार, दिपक महाडिक, मयुर तांबडे, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, सुनिल कटेकर, दिपक घोसाळकर, गौरव जहागीरदार, भरतकुमार कांबळे, कल्पेश कांबळे आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मोहोकर यांनी केले.
समाज प्रबोधनाचा वारसा वारकर्यांनी सुरू ठेवा – जे.एम.म्हात्रे
